बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे नूतन डीसीपी एन. व्ही. बरमनी यांनी आज शुक्रवारी पदभार स्वीकारला. राज्य सरकारने धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक असलेले बरमनी यांची बेळगावचे डीसीपी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार, डीसीपी निरंजन राजे अर्स यांनी शहर पोलिस आयुक्त कार्यालयात त्यांना पदभार सोपवला.

पदभार स्वीकारताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एन. व्ही. बरमनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या सहकार्याने बेळगावला एक चांगले आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.