• सुदैवाने चालक बचावला

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडीनजीक बडेकोळ्ळमठ परिसरात एक भीषण अपघात घडला. यामध्ये मालवाहक गाडीच्या चालकाने गाडी डिव्हायडरवर चढवून स्वतःचा जीव वाचवला आहे. या घटनेत तो थोडक्यात वाचला आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना आहे.

बेळगावहून धारवाडच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट राष्ट्रीय महामार्ग ४ वरील डिव्हायडरवर आदळली. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक कार्यवाही करत अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवले.

गेल्या काही महिन्यांपासून याच ठिकाणी अपघातांची संख्या गंभीरपणे वाढली आहे, ज्यामुळे अनेक लोकांनी आपला गमावला आहे. बडेकोळ्ळामठजवळचा महामार्गाचा भाग तीव्र वळणांचा आणि उताराचा असल्याने भरधाव वेगातील वाहनांच्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. या परिसरात पोलीस आयुक्तांनी जनजागृतीसाठी उपाययोजना केल्या असल्या तरी, अपघात सातत्याने घडत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.