- गरजूंसाठी अन्न व चादरींचे वाटप
बेळगाव : अनंत अंबानी यांच्या दि. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरी ‘निवारा केंद्राना’ आधार देणारा हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. खासबाग येथील शहरी बेघर निवारा केंद्रात अन्नधान्य आणि चादरींचे वाटप करण्यात आले.

‘अनंत सेवा फाउंडेशन’च्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. यासाठी ‘पाही व्हायब्स फाउंडेशन’, ‘बेळगाव चॅलेंजर्स टँजेंट ३८’, आणि ‘बेळगाव १२५ चा ४१ नर्स क्लब’ ‘ यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाद्वारे गरजूंपर्यंत आवश्यक मदत सन्मानपूर्वक पोहोचवण्यात आली.








