गदग : लक्ष्मेश्वर तालुका गदग येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगाव येथील मानस कराटे अकॅडमीने आपले वर्चस्व सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाचे श्रेय मानस कराटे अकॅडमीचे (शिहान )भरमाणी म. पाटील व ज्ञानेश्वर चिक्के यांच्या मार्गदर्शनाला जाते. या स्पर्धेमध्ये बेळगाव शहर, शिवम गणेशपूर, विजयनगर, बेकिनकेरे तसेच महाराष्ट्रातील कुदनूर आणि निट्टूर या विविध ग्रामीण भागातून आलेल्या अनेक तरुण आणि उत्साही कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत खालील खेळाडूंनी विविध क्रमांक पटकावले : प्रथम क्रमांक: साक्षी कांबळे, करण पुजारी, पृथ्वीराज कांबळे, अनिरुद्ध पवार, साई पाटील, आदित्य गुरव, सानवी पाटील आणि सुकन्या कडोलकर.
दुसऱ्या क्रमांकाचे विजेते : शेखर पुजारी, अमर मुरचुटे, पृथ्वी घेवडे, प्रांजल जाधव, सानवी पाटील, तन्वी जाधव, श्रेया चौगुले, वेदांती पाटील, श्रेया मिश्रीकोटी, अनिरुद्ध सातेरी, तुषार वाडकर, शिवप्रसाद कौजलगी, आणि अस्मी पाटील.
तिसऱ्या क्रमांकाचे विजेते : आरुष यादव, विराज टवकरी, रिदम गोरे, अपेक्षा घेवडे, साची गांगरकर , प्रीती पाटील, सृष्टी भोगण, अर्पणा इंटुरी, मार्लिंग इंटुरी, आर्यांश गिरी, सर्वेश कुंडेकर, श्रद्धा चौगुले, सचिन नंदी, साई श्री निकम, मृणाली घुमटे आणि मशनू पाटील या सर्व कराटेपटूनी यश संपदान केले.








