• फक्त १२ टीएमसी पाणी शिल्लक
  • विजयपूर – बागलकोटमध्ये भीषण पाणीटंचाई

विजयपूर : उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या कडक उन्हामुळे आलमट्टी जलाशयातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे.

सध्या जलाशयात केवळ १२ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. उष्ण हवामानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने साठा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांवर स्पष्टपणे जाणवत असून दोन्ही जिल्ह्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.