बेंगळुरू : काँग्रेस पक्षाच्या संघटनेत सक्रिय असलेल्या खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ‘एसआयआर’ निरीक्षक म्हणून डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
एआयसीसीच्या वतीने गोव्यासह विविध राज्यांच्या प्रभारी म्हणून यशस्वीपणे काम करणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर यांना आता केपीसीसीने कित्तूर कर्नाटक विभागाचा प्रभार दिला आहे. त्यांची बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, चिक्कोडी, बागलकोट, विजयपुरा, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, हुबळी शहर आणि धारवाड ग्रामीण जिल्ह्यांच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘एसआयआर’ प्रक्रिया योग्यरित्या राबवली जात आहे की नाही याचा आढावा घेण्यासाठी, स्थानिक नेत्यांना आवश्यक सहकार्य देण्यासाठी आणि केपीसीसीला अहवाल सादर करण्यासाठी ते या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. डॉ. अंजली यांच्या प्रभावी संघटनात्मक कार्यामुळे कित्तूर कर्नाटक विभागात पक्षाच्या या प्रक्रियेला नवी गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








