• अथणी तालुक्यातील घटना
  • मृतदेह उसाच्या शेतात फेकून मारेकऱ्यांचे पलायन

अथणी / वार्ताहर

अज्ञातांनी माय – लेकाची निर्घृण हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून देत पलायन केले. कोडगनूर (ता.अथणी, जि. बेळगाव) येथे रविवारी ही घटना घडली.  मृतांची ओळख पटली असून चंद्रव्वा अप्पाराय इचेरी (वय ६२) आणि विठ्ठल अप्पाराय इचेरी (वय ४२) अशी हत्या झालेल्या माय – लेकाची नावे आहेत. हे दोघेही शेती करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होते.

अज्ञातांनी लोखंडी शस्त्रांच्या सहाय्याने वार करून दोघांना ठार केले आणि पळ काढला. या घटनेनंतर अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.  मात्र या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण गाव अजूनही हादरले आहे