बेळगाव : अनगोळ रोड, टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव करण्यात येणार आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए, एमसीए, सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि पीएच. डी. प्राप्त मुलांचा गौरव करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत अनगोळ रोड, टिळकवाडी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात दि. 15 जुलैपर्यंत आणून द्यावी, असे आवाहन दि आदर्श मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव यांनी केले आहे.
September 23, 2025
नवरात्री २०२५ : नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट रंगाचे महत्त्व असते आणि लोक सहसा त्याच रंगाचे कपडे त्या दिवशी परिधान करतात. इतकेच नाही, तर नवरात्रीची थीमही […]