बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे दुपारीकरण झाले आहे. दुपदरीकरण झाले असतानाही अनेक वेळा शहरातील विविध रेल्वे फाटकांवर रेल्वे गाड्या बराच उशिरापर्यंत थांबून राहिलेल्या दिसतात. रेल्वे फटकावर रेल्वे गाड्या अडकून राहिल्यामुळे,दोन्ही बाजूच्या वाहनधारकांची मोठी पंचायत होते. वाहतुकीची कोंडी निर्माण होते. असाच प्रकार आज मंगळवारी दुपारी पाहायला मिळत आहे. टिळकवाडी दुसऱ्या रेल्वेगेट दरम्यान मालगाडी तब्बल अर्धा तास थांबून राहिल्यामुळे, दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. त्यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली.