बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत प्रथमच शाॅपिंग उत्सव प्रदर्शनात पर्यटन, इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, वस्त्र प्रावरणे, ज्वेलरी, गुंतवणूक, विमा व रुचकर शाकाहारी खाद्य प्रदर्शनाचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मिलेनियम गार्डन टिळकवाडी येथे उद्या शुक्रवार दि. १५ ते मंगळवार दि. १९ ऑगस्ट दरम्यान ५ दिवस आयोजित केले असून एकाच छताखाली ८० स्टॉल मधून सुमारे १० हजार वस्तू मांडण्यात आल्या आहेत.
सदर प्रदर्शनात फर्निचर विभागात क्लासिक इंटिरियरचे सोफा डायनिंग टेबल, बेडरूम सेट, वेलस्पनचे बेडशीट, टॉवेल व कर्टन्स, यश मॉड्युलर किचन व आय रेस्ट हेल्थ केअर इक्विपमेंट. ईव्ही ऑटो विभागात यश ऑटो अँपरी, बेल्लद अँड कंपनीची एमजी ई कार, अथर ई बाईक, डॉनब्रो इंटरप्राईजेसची सिम्पल, रिव्हर आदि , विमा विभागात स्टेट बँक ऑफ इंडिया व एंजल वन, पर्यटन विभागात आरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स, एक्सपेडीया, क्वेस्ट टूर्स, जान्हवी टुरिझम, वर्ल्ड टूर्स बेंगलोर आदि. गारमेंट्स विभागात पूनम कलेक्शन, नाज लेडीज गाऊन, दीप कलेक्शन, कॕरीज कलेक्शन, सिद्धार्थ हॅण्डलूम कॉटन बेडशीट, पूजा लेडीज कुर्ती, शाम काश्मिरी टॉप, अमिषा ड्रेसेस, काश्मिरी ड्रेस मटेरियल, शाल, साडी, जे पी स्टोअर, श्री कलेक्शन व श्रीनीता फॅशन आदि.
ज्वेलरी विभागात मायराज वर्ल्ड, नक्षत्र आर्ट मुंबई, जयपुरी सिल्वर ज्वेलरी, वर्धमान ज्वेलर्स. भवानी क्रिएशनची केशभूषा, गुरुदेव अरोमा हाऊसची नैसर्गिक अगरबत्ती व धूप, शैक्षणिक विभागात एक्सप्लोर लर्निंग सेंटर, श्रद्धा टेराकोटा कुंड्या, लेड्यूरची एलईडी श्रेणी, चेतना लेडीज बॅग व पर्स, हरी ओम स्वदेशी चिकित्सा केंद्राची विविध आयुर्वेदिक औषधे व भारतीय वनौषधी.
महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीजची आटा चक्की, सोलार वर्ल्डची विविध उत्पादने, इन्स्टंट वॉटर हीटर, स्वामी समर्थ पूजेचे साहित्य, काॅटन बेडशीट पिलो कव्हर, मुखवास, गोबी मंचुरियन मसाला, चेअर मसाजर, फूड लाइफचे लोखंडी तवे, ओरिफ्लेम प्रसाधने, आर्टिफिशियल ज्वेलरी, कोरियन वेस्टर्न ड्रेस, साडी ड्रेस मटेरियल, वेस्टर्न स्प्रे, जयपूरी कुर्ता पायजमा, आर. के. परफ्युम, ४० ते ७० टक्के सवलतीच्या खजिन्यात विविध वस्तूंचा खुला बाॅक्स आयुर्वेदिक औषधे, विविध प्रकारचे जयपुरी व रागी पापड, होम क्लिनर, इमिटेशन फॅन्सी ज्वेलरी, घरगुती उपयोगी उपकरणे, राजस्थानी लोणची, टीव्ही फ्रीज कव्हर, लेडीज टाॅप्स, श्रीशा सोलार, लहान मुलांची खेळणी, बल्क डील्सतर्फे इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ४० ते ७० टक्के सवलतीत टीव्ही फ्रिज व घरगुती उपकरणे, फॅन्सी व टिकाऊ लेडीज व जेंट्स चप्पल, युरेका फोर्बस वाॅटर प्युरिफायर आदि.
खवय्यांसाठी शाकाहारी खाद्य महोत्सवात भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, मंचुरी, पावभाजी, खास पंजाबी पराठा, मोमोज, पिझ्झा, बर्गर, सँडविच, केक, स्प्रिंग पोटॅटो, स्वीट कॉर्न, टी लवर्सची चहा व कॉफी उत्पादने आदी उपलब्ध आहे. प्रदर्शन सकाळी १०.३० रात्री ९ पर्यंत सुरु राहणार आहे.