बेळगाव / प्रतिनिधी
श्रावण शनिवार निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आणि दुपारी मंदिरात तैल अभिषेक करण्यात येणार आहेत. सकाळी अभिषेक झाल्यावर शनी शांती, शनी होम, तीळ होम आणि शनी कथा वाचन होणार आहे. अभिषेक झाल्यावर अलंकार सेवा करण्यात येणार असून त्या नंतर महा आरती करण्यात येणार आहे. भक्तांनी दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंदिराचे ट्रस्टी आणि पुजारी विलास अध्यापक यांनी कळवले आहे.