बेळगाव / प्रतिनिधी
आरटीमो सर्कल येथील विभागीय परिवहन आयुक्त कार्यालय आणि बेळगाव प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्घाटन सोहळा येत्या शुक्रवार दि. १८ सकाळी ११.३० वाजता होणार आहे. राज्याचे परिवहन खात्याचे तथा धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंग रेड्डी यांच्याहस्ते या नूतन कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी आमदार असिफ (राजू) सेठ आहेत. कार्यक्रमास मुख्य प्रतोद अशोक पट्टण यांच्यासह वायव्य परिवहन निगम नियमितचे अध्यक्ष भरमगौडा कागे, राज्य वित्त संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी यांच्यासह वाहतूक विभागाचे राज्य आयुक्त ए. एम. योगेश, राज्य उपायुक्त के. टी. हालस्वामी, बी. पी. उमाशंकर, सी.पी. मूर्ती, पुरुषोत्तम, बेळगाव (आरटीओ) विभागाच्या प्रादेशिक आयुक्त ओमकार ईश्वरी अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.