बेळगाव / प्रतिनिधी

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर फेडरेशन संस्थेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी आंदोलन कार्यालयासमोर छेडण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले.

जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. कर्मचारी वर्गाला सेवा सुरक्षितता द्यावी, त्याचप्रमाणे इतर आवश्यक लाभ पुरविण्यात यावेत. अशी मागणी देखील करण्यात आली. या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.