- माजी सैनिकांसाठी जनरल ड्युटी आणि क्लर्क पदांची संधी
- मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात आयोजन
बेळगाव : डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डीएससी) मध्ये पुनर्नियुक्तीसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे १ आणि २ डिसेंबर २०२६ रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत मराठा लाईट इन्फंट्रीच्या नियमित लष्करातील माजी सैनिक तसेच प्रादेशिक सेना (टीए) मधील कर्मचारी सहभागी होऊ शकणार आहेत.
या मेळाव्याद्वारे सैनिक जनरल ड्युटी आणि सैनिक क्लर्क या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पुनर्नियुक्तीसाठी संबंधित पदांनुसार वयोमर्यादा आणि निवृत्तीनंतरचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
सैनिक जनरल ड्युटी पदासाठी माजी सैनिकाची निवृत्ती झाल्यापासून दोन वर्षांच्या आत पुनर्नियुक्ती होणे आवश्यक आहे. तसेच भरतीच्या दिवशी उमेदवाराचे वय ४६ वर्षांपेक्षा कमी असावे. सैनिक क्लर्क पदासाठी निवृत्तीनंतर पाच वर्षांच्या आत पुनर्नियुक्ती होणे गरजेचे असून, उमेदवाराचे वय ४८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
डीएससीमध्ये सेवा करण्यास इच्छुक आणि निर्धारित निकष पूर्ण करणाऱ्या माजी सैनिकांनी १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीसंदर्भातील अधिक माहिती आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा.








