बेळवट्टी : येथील बेळवट्टी हायस्कूलच्या सतरा वर्षे खालील मुलींच्या कबड्डी संघाने नुकताच धारवाड येथे संपन्न झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या संघातील तीन खेळाडूंची राज्य स्तरावर निवड झाली आहे. कु.दर्शना दशरथ पाटील, प्रतिक्षा परशराम नाकाडी, दीक्षा दत्तू पाटील या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.ग्रामीण भागातील मुलिंची ही गरुड झेप उल्लेखनीय आहे.
क्रीडा शिक्षक अजय गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक जी. एन. तंगणाचे तसेच संस्था अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.








