- मुख्य न्यायमूर्ती विभू बाखरु यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
- राजभवनात मान्यवरांची उपस्थिती
बेंगळुरू : कर्नाटकच्या नवीन राज्यपाल म्हणून डॉ. सुधा यादव यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विभू बाखरु यांनी राजभवनात आयोजित समारंभात त्यांना शपथ दिली. मावळते राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ. सुधा यादव यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.
या शपथविधी सोहळ्याला मावळते राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर उपस्थित होते. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील, पर्यटन व ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज आणि गृहमंत्री प्रियांक खरगे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी टी. नारायणस्वामी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम आणि बेंगळुरू शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांच्यासह विविध मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.








