नवरात्री २०२६ : नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट रंगाचे महत्त्व असते. सहसा त्याच रंगाचे कपडे त्या दिवशी परिधान करण्यास सर्वजण प्राधान्य देतात. इतकेच नाही तर नवरात्रीची थीमही प्रत्येक दिवशीच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांमध्ये केली जाते. दरवर्षी नवरात्रीला या रंगांचा क्रम बदलतो.

आज सोमवार दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेत साई कॉलनी, सुळगा (हिं.) येथील सासू-सून ग्रुपच्या महिला.

सोमवार दि. १२ ऑक्टोबर २०२६ : दुसरी माळ

आजचा रंग : पांढरा

रंगाचे महत्त्व :
• शांती आणि पवित्रता : पांढरा रंग मनाची स्वच्छता आणि शांतता दर्शवतो. देवीच्या उपासनेत हा रंग आंतरिक शुद्धतेचे प्रतीक मानला जातो.
• नवीन सुरुवात : पांढरा रंग म्हणजे जुने विसरून कोऱ्या पाटीवर नवीन चांगली सुरुवात करण्याची प्रेरणा देतो.
• देवी ब्रह्मचारिणी किंवा महागौरीचे रूप : नवरात्रीत पांढरा रंग हा देवीच्या शांत आणि सात्विक रूपांशी जोडलेला असतो. (उदा. देवी ब्रह्मचारिणी किंवा महागौरी, जिचे रूप पांढऱ्या प्रकाशासारखे शुद्ध मानले जाते).