• शिवानंद महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

कागवाड : येथील शिवानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी सानिया गायकवाड हिने राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

चिकोडी येथील बी. के. कॉलेजमध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात सानिया गायकवाड हिने ‘संत बसवेश्वर यांच्या वचनांची प्रासंगिकता’ या विषयावर हिंदी भाषेतून शोधनिबंध सादर केला. अभ्यासपूर्ण मांडणी, विषयाचे सखोल आकलन आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर तिने द्वितीय क्रमांक मिळविला. तिच्या शोधनिबंधाचे आणि सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.

सानियाने हा शोधनिबंध शिवानंद महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्रीय स्तरावर आपले संशोधन सादर करण्याची संधी मिळाल्याचे सानियाने सांगितले.

सानियाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालय संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.