बेळगाव : मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगांव व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या वतीने रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता स्वरतरंग हा बासरी वादन व गायनाचा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा व नचिकेत सुहास गुर्जर यांचे बासरी वादन, श्रीमती पद्मा नाडगौडा यांचे हार्मोनियम गायन , कुमारी वैष्णवी नाडगौडा यांचे भावगीत गायन व वैभव गाडगीळ यांचे तबलावादन होणार आहे. विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीने हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे.
तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) खानापूर रोड, बेळगांव येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








