• इंडीयन दस्तकार हैंडलूम व हँडीक्राफ्ट हाटचे उद्घाटन

बेळगाव : देशातील वीसहून अधिक राज्यातील विविध हस्तकला कारागिरांची प्रकारची उत्पादने इंडियन दस्तकार हँडलूम व हँडीक्राफ्ट हाटने आज बेळगावात सदाशिवनगर येथील प्रदर्शनात उपलब्ध करून दिली आहेत. हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावकरांनी या उत्पादनांचा खरेदी करून लाभ घ्यावा असे आवाहन उत्तरचे आमदार आसिफ राजू सेठ यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

प्रारंभी इंडियन दस्तकार हॅण्डलूमचे संचालक अहमद खान यांनी आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी, समाजसेवक प्रसाद मरगाळे आदी उपस्थित होते.

इंडीयन दस्तकार हैंडलूम व हँडीक्राफ्ट हाट प्रदर्शन आता कुंदा नगरी बेळगाव सदाशिवनगर परिसरात लक्ष्मी कॉम्प्लेक्स शेजारी येथे मंगळवार दि. 26 सप्टेंबर पासून सुरू झाले आहे. या प्रदर्शनात देशभरातील ५० हून अधिक स्टाॅलधारकांनी भाग घेतला आहे.

सदर प्रदर्शनात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,ओडीसा, काश्मीर, शिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरला, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मुरादाबाद,आग्रा, केरला, बिहार, वेस्ट बंगाल, झांसी, लखनौ, फिरोजाबाद मिर्झापूर, नेपाळ सहारानपुर फर्निचर येथील हस्तकला कारागीरांनी स्वत: हातानी बनविलेल्या वस्तू या हस्तकला प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.

संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी अशा प्रकारचे हे प्रदर्शन ४० दिवस चालणार असून प्रदर्शनात प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. हस्तकला कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.