बेळगाव : हिंडाल्को आयोजित ‘AVIISHKAR 2026’ अभियांत्रिकी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावच्या इयत्ता दहावीतील आदिनाथ पाटील व रोहित शेट्टी यांनी ‘Anti-Sleep Truck Driver Monitoring System’ हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय एस्.एम्.सी कमिटीचे चेअरमन प्रो. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस. पाटील व सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना, वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि संशोधनवृत्तीला मिळालेली ही प्रेरणादायी दाद ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.