येळ्ळूर : मूळचे विराट गल्ली येळ्ळूर, सध्या करीअप्पा काॅलनी, नानावाडी बेळगाव येथील रहिवासी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. अशोक फकीरा बस्तवाडकर (वय ७२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी झाले पहाटे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,आई, दोन कर्ते चिरंजीव, एक सून, तीन भाऊ, दोन बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज रोजी दुपारी १२ वाजता शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रक्षा विसर्जन गुरूवार दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.