• टिळकवाडीत उद्या आध्यात्मिक मेळावा

बेळगाव : गुरुपौर्णिमेनिमित्त पाही वाईब्स फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार, २९ जुलै रोजी विशेष पौर्णिमा ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आत्मचिंतन, मानसिक शांतता आणि गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा आध्यात्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

टिळकवाडी सोमवार पेठेतील पाटील डेअरीसमोरील स्नेह वास्तू (पहिला मजला) येथे सायंकाळी ५.३० वाजता हे ध्यान सत्र होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही क्षण स्वतःसाठी देत मनःशांतीचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमात कुटुंबीय, मित्र-परिवार तसेच सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपस्थित राहणाऱ्यांनी ९७३१७१७९०५ या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे पूर्वनोंदणी करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

आध्यात्मिक ऊर्जा, शांतता आणि सकारात्मकतेचा अनुभव देणाऱ्या या ध्यान सत्रात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाही वाईब्स फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.