बेळगाव : रोटरी क्लबतर्फे कणबर्गी येथील सरकारी हायस्कूलमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन विषयावरील जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ११० विद्यार्थिनींनी सहभाग दर्शविला.

रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी,मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता, पोषण, वैयक्तिक आरोग्य तसेच सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.त्याचबरोबर लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व वैयक्तिक सुरक्षिततेबाबत विद्यार्थिनींना माहिती दिली.

कार्यक्रमाचे संयोजन रोटेरियन सुरेखा मुम्मिगट्टी व डॉ. स्मिता गुडगणट्टी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल एकत्र फाउंडेशनच्या अध्यक्षा रोटेरियन पुष्पा पर्वतराव यांचे रोटरी क्लबतर्फे आभार मानण्यात आले.