- प्रादेशिक विभागाच्या कामकाजाचा घेणार आढावा
बेळगाव : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गुरुवार, दि. ९ जुलै रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार असून सुवर्ण विधानसौध येथे प्रादेशिक विभागातील विविध खात्यांच्या कामकाजाचा प्रगती आढावा घेणार आहेत.
नियोजित दौऱ्यानुसार, ते गुरुवारी सकाळी ९ वाजता बेंगळुरू येथील एचएएल विमानतळावरून विशेष विमानाने बेळगावकडे रवाना होतील. सकाळी १०.१० वाजता सांबरा विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते रस्तेमार्गे सुवर्ण विधानसौधकडे रवाना होतील. सकाळी १०.३० वाजता सुवर्ण विधानसौध येथे पोहोचल्यानंतर प्रादेशिक विभाग स्तरावरील विविध खात्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देणार आहेत.
बैठक संपल्यानंतर दुपारी ३.२० वाजता ते सांबरा विमानतळावरून विशेष विमानाने पुन्हा बेंगळुरूकडे प्रयाण करणार आहेत.








