• शुभम शेळके यांच्यावरील पोलिसी कारवाईचा निषेध

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक आज १६ जून रोजी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीचे प्रस्तावित व उद्देश संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगताना येत्या २२ जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या कन्नडसक्ती विरोधी महामोर्चात मराठी भाषिकांच्या बहुसंख्येने सहभागी व्हावे, त्याचबरोबर वेळोवेळी शुभम शेळके यांना बेळगाव पोलीस प्रशासनाने दिलेल्या नोटीसीचा निषेध व्यक्त करतांना मराठी भाषिकांनी एकजूट दाखवून लढणाऱ्याला पाठबळ दिले पाहिजे असे आवाहन केले.

कर्नाटक सरकारने त्यांच्याच कायद्यांची पायमल्ली करत असताना ही कन्नडसक्ती लागू केलेली आहे, पंधरा टक्क्याहून अधिक मराठीभाषिक या सीमाभागात राहत असताना आपल्याच कायद्याचे उल्लंघन करत कर्नाटक सरकारने मराठीला डावलले आहे, त्याबद्दल कर्नाटक सरकारला या मोर्चाद्वारे जाब विचारण्यात यावा, असे आवाहन सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी केले.

अध्यक्षस्थानी बोलत असताना शुभम शेळके यांनी प्रशासनाला घाबरून काही मराठी व्यापारी आपल्या अस्थापणावर मराठीला स्थान देत नाही झालेत तर काही कन्नड व्यापारी आपल्या भाषेबरोबरच मराठीला स्थान देत आहेत, मराठी असो वा कन्नड मराठी भाषेला स्थान देणाऱ्या दुकानातूनच व्यवहार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर येता मोर्चा यशस्वी करून मराठी एकजूट व ताकत कर्नाटकी प्रशासनाला दाखवून देण्याचेही त्यांनी आवाहन केले.

शिवाजी हवळाणाचे व रणजित हवळाणाचे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे,सुरज जाधव, अभिजित मजुकर,निलेश काकतकर, रोहीत जाधव,मोहन धाकलुचे,रोशन पाटील,प्रणय पाटील,परशराम निलजकर, प्रशांत बैलूरकर, प्रभाकर पाटील, श्रीराम पाटील,यश राव,गणेश घवारी, वेदांत पवार,विनायक, प्रतिक पट्टण,प्रविण मजुकर, अमर पाटील, सुरज अनगोळकर, अभिषेक कारेकर,दिपक कालकुंद्री,प्रणित जाधव, अक्षय पाटील,नागेश सरप,रोहन खांडेकर,शुभम देसुरकर आदी उपस्थित होते.