बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या २२ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे तरी या मोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावले उचलली जावी आणि तज्ञ समिती बैठक बोलाविण्यात यावी यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धरणं आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे वतीने मंगळवार दिनांक १६ जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे ही मराठा मंदिर येथे सायंकाळी ५ वाजता बोलाविण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी व मराठी भाषिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके कार्याध्यक्ष धनंजय पाटील व सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी केले आहे.
June 16, 2026
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी कोल्हापूर जिल्हाधिकारी – जिल्हा पोलिसप्रमुखांना निवेदन कोल्हापूर : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार […]








