- काकती पोलिसांची कारवाई ; १.६० लाखांहून अधिक रक्कम जप्त
बेळगाव : तालुक्यातील होनगा औद्योगिक क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांच्या माध्यमातून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काकती पोलिसांनी छापा टाकून २० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होनगा औद्योगिक परिसरातील एका ठिकाणी काही जण पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एकूण १ लाख ६० हजार रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणात यासीन तहसीलदार, आरिफ शहापुरी, मोहम्मद जत्ती, मन्सूर बागवान, सर्फराज शहापुरी, फैझान मुजावर, शानूर मुचंडी, आरिफ मुल्ला, सुनील अष्टेकर, दस्तगीरसाब देसाई, वासीम मुजावर, अल्ताफ मुजावर, दस्तगीर मुल्ला, आरिफ काकतीकर, सकलीन तंबाखवाले, सिराज काझी, आतिफ सौदागर, प्रकाश बन्ने, गणपती केंशव्वगोळ आणि जहांगीर नाईक या २० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या रकमेचा आणि इतर साहित्याचा पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काकती पोलीस करत आहेत.








