बेळगाव : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त सह्याद्रीनगर येथील श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी तंबाखू निषेधाच्या निमित्ताने निषेधाच्या पार्श्वभूमीवर पोस्टर आणि बॅनरचे प्रदर्शन मांडले होते. यामधून जनजागृती करण्यात आली. तसेच आसपासच्या परिसरात जागृती फेरी काढून नागरिकांना तंबाखू निषेधाचे आवाहन करण्यात आले. तंबाखू, गुटखा तसेच सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहावे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आधार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. डी. टी. बामणे यांच्याहस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रम संयोजनासाठी डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. पी. जयमोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी वर्गाने परिश्रम घेतले.