बेळगाव : चनम्मानगर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि जीआयटी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य राघवेंद्र व्ही.पर्वतीकर (वय ८४) यांचे सोमवार दि. ४ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. त्यांनी बागलकोट इंजिनियर्निंग कॉलेज, जीआयटी आणि मराठा मंडळ इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सेवा बजावली होती. जीआयटी कॉलेजमधून ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कर्ता मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
May 8, 2026
तलवार आणि चाकूसह दोघांना अटक बेळगाव : शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांच्या ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’कडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान […]








