बेळगाव : सीबीएसई अभ्यासक्रमातील दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक देवकिरण रामचंद्र गहनोलिया (92.2 टक्के) द्वितीय क्रमांक प्रिया उत्तम मंडोळकर (87.6 टक्के) आणि तृतीय क्रमांक नियती मल्लाप्पा पार्लेकर (85.8 टक्के) यांनी यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या आर आर.जोशी, वर्गशिक्षक शुभम परालशेट्टर आणि सर्व सहकारी शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. चेअरमन डॉ. डी. टी. बामणे आणि डॉ. अरुण जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
April 17, 2026
गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी तपासणी श्वान पथकांचा सहभाग ; कर्मचाऱ्यांना इशारा बेळगाव : हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक […]








