बेळगाव : हॉकी खेळाडूमध्ये एकाग्रता हवी, बेळगावात एस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे यासाठी प्रयत्न करू असे जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिले.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून प्रशिक्षणार्थीनी परिश्रम घेणे महत्त्वाचे आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हॉकी खेळाडूना मदतीचे आश्वासन युवा उद्योजक कपिल भोसले यांनी सांगितले.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या व्यासपीठावर माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, युवा उद्योजक कपिल भोसले, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर व सभासद उपस्थित होते.

बेळगाव हॉकीच्या ९ खेळाडूंची हॉस्टेलमध्ये तसेच अग्निवीर आणि मराठा सेंटरमध्ये देखील हॉकी खेळाडूंची निवड झाली असून करियर घडवण्यामध्ये हॉकी खेळ योग्य असल्याचे सुधाकर चाळके यांनी प्रारंभी सांगितले.

हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. १५० मुलां – मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणार्थीना दरऱोज अंडी, केळी, दुध देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी, प्रशांत मंकाळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. उद्घाटन समारंभाला श्रीकांत आजगांवकर, सागर पाटील, दत्तात्रय जाधव , संजय शिंदे, रमाकांत कारेकर, प्रकाश बिळगोजी, सुरेश पोटे, मनोहर पाटील, शांताप्पा नरगुदी, गणपत गावडे, नामदेव सावंत, विकास कलघटगी, गोपाळ खांडे, अनिल राणे, शिवानंद गोडबोले, अश्वगंधा कुगजी, प्रिया जैन, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, मनिषा गोडबोले आदी सभासद उपस्थित होते.