बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील हारूगोप्प व चचडी परिसरात वाढत्या दारू दुकानांच्या पार्श्वभूमीवर शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना महिलांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. हारूगोप्प-चचडी चौकात सुरू झालेल्या दारू दुकानामुळे मद्यधुंद अवस्थेत रस्ता ओलांडताना अपघात घडत असून याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दारूमुळे घरगुती वाद वाढले असून कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिघडत असल्याचे महिलांनी सांगितले. तसेच महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप करत गल्लीबोळात सुरू असलेली अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात चचडी गावातील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला.








