बेळगाव : मूळचे तानाजी गल्ली बेळगाव व सध्या पंचवटी कॉलनी, शिवतीर्थ अपार्टमेंटच्या मागील बाजूस, महांतेशनगर बेळगाव येथील रहिवासी श्री. विक्रांत परशराम शेळके (वय ५९) यांचे आज मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष तथा युवा नेते शुभम शेळके यांचे ते वडील होत. विक्रांत शेळके हे बर्डे रोडलाईन्स येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर उद्या बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.
February 24, 2026
प्रकल्प बेळगावसाठी सुरक्षित ठेवण्याकरिता हस्तक्षेप करण्याची मागणी बेळगाव / प्रतिनिधी शहरासाठी मंजूर झालेल्या सिटीज २.० प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प बेळगावसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने […]







