बेळगाव : मंडोळी बसवाण गल्ली येथील रहिवासी श्री. सुरेश यल्लाप्पा दळवी (वय ६२) यांचे आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४४ मिटांनी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई असा परिवार आहे. अंत्यसंस्कार सायंकाळी ७ वा. मंडोळी येथील स्मशानभूमीत होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे चिटणीस सचिन दळवी याचे वडील होत.