येळ्ळूर ता. ८ : समाज सारथी सेवा संघ येळळूर यांच्या मार्फत गवंडी व सेंट्रीग कामगारकरीता मार्गदर्शन मेळाण्याचे आयोजन केले असुन हा मेळावा रविवार ता. ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता श्री चांगळेश्वरी मंदिर येथे संपन्न होणार आहे. या मेळाण्यासाठी ॲड. एन. आर. लातुर अध्यक बांधकाम कामगार संघटना बेळगाव हे कामगाराना कामगारकार्ड काढण्यापासून ते त्याना मिळणाऱ्या सुविधा यावर मार्गदर्शन करणार आहेत हा कार्यक्रम सौ. लक्ष्मी मासेकर येळळूर ग्राम पंचायत अध्यक्षा यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे.

या कार्यक्रमाला गव्ह. कॉट्रॅक्टर विजय धामणेकर, रोटरी जिल्हा प्रांतपाल अशोक नाईक, अभियंते व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर विवेक धामणेकर, रिजनल हेड आल्ट्राटेक अशोक रेड्डी कोलूर ‘टेकनिकल ऑफिसर अल्ट्राटेक गणपती मुंबारे व सोनिया अनगोळकर, उद्योजक आर. एम .चौगुले, समाज सेवक डॉ. शिवाजी कागणीकर, सेवानिवृत्त पिडीओ दुर्गाप्पा ताशिलदार व नौदल लेप्टनंट चंदन कुमार खेमणाकर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कामगारांनी विचारलेल्या अडचणी व समस्यांचे निवारण करून त्याना मार्गदर्शन करणार असल्याने परिसरातील कामगार वर्गाने याचा लाभ घ्यावा असे अवाहन समाज सारथी सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.