बेळगाव / प्रतिनिधी

दिवंगत दीपक दळवी यांच्या निधनानंतर, येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांना सांत्वन दिले.

यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य रावजी महादेव पाटील यांनी मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्नासाठी दळवींसोबत केलेल्या कामाच्या आठवणी उजाळा दिला. शांताराम कुगजी यांनी दीपक दळवींचे येळ्ळूरशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले.

येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांनी सांगितले की, दीपक दळवींचे निधन ही संपूर्ण सीमा लढ्याची न भरून येणारी हानी आहे. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी सीमाप्रश्न सोडवणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार मांडले.

समितीच्या सदस्यांनी दळवी कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि समितीचा प्रत्येक कार्यकर्ता कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली. या भेटीप्रसंगी भुजंग पाटील, प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, मनोहर पाटील, लक्ष्मण मेलगे, विठ्ठल कुरंगी, मल्लाप्पा काकतीकर, मधु पाटील, अभिषेक देसूरकर यांसह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.