विजयपूर / दिपक शिंत्रे
दक्षिण कन्नड जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. आनंद के. यांनी बुधवार दि. ९ जुलै रोजी विजयपूरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.
विजयपूरचे मावळते जिल्हाधिकारी टी. भूबलन यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन बुधवारी अधिकृतरित्या पदभार सुपूर्द केला. जनरल मेडिसिन शाखेत एमबीबीएस व एमडी वैद्यकीय पदवी प्राप्त केलेले डॉ. आनंद के. हे मागील दोन वर्षांपासून दक्षिण कन्नड जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
त्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयात सहाय्यक सचिव, गदग जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी व प्रशासन सुधारणा विभागात उपसचिव म्हणून काम पाहिले आहे. तसेच उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि इंडी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पदावरही त्यांनी सेवा बजावली आहे.