विजयपूर / दिपक शिंत्रे
अलीकडे हुबळी येथे रामनवमी जन्मोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात विजयपूर शहराचे आमदार श्री. बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी महंमद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमठल्या आहेत. याच संदर्भात जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शहरातील मुस्लिम नेत्यांबरोबर सामाजिक सौहार्द राखण्यासाठी एक बैठक घेण्यात आली.
या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी विजयपूर शहरात बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येणार असून बसवनगौडा पाटील यांच्या घराला घेराव घालण्याचा माहितीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या संदर्भात, मुस्लिम समाजातील नेत्यांनी हमीद मुश्रीफ, टपाल इंजिनिअर,अल्ताफ खादीरी, मैनुद्दीन बीळगी, एम.सी. मुल्ला इत्यादींनी एकत्र येऊन, आमदार यत्नाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, आमदार यत्नाळ यांचे वक्तव्य मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे आहे आणि त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या प्रकरणी संबंधित ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि हुबळी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दि. १५ एप्रिल मंगळवार रोजी शहर बंद अथवा मोर्चा काढण्यात येणार नाही. सार्वजनिकांना कोणत्याही अफवा किंवा खोटी माहिती वर विश्वास ठेऊ नये आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सोशल मीडियावर दक्षता :
या प्रकरणाशी संबंधित कोणतीही अफवा, खोटीमाहिती, अवमानकारक पोस्ट किंवा संदेश सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.








