• किणये – जांबोटी मार्गावर अपघात

बेळगाव / प्रतिनिधी

भाजीची वाहतूक करणाऱ्या कॅन्टरने थांबलेल्या ट्रकला ठोकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान जांबोटी रोडवरील किणयेजवळ घडली.

मधु कल्लाप्पा अष्टेकर (वय ४०) असे मयत झालेल्या युवकाचे नाव असून चालक शुभम चौगुले रा. दोघेही बिजगर्णी हा किरकोळ जखमी झाला आहे. कॅन्टर क्रमांक केए २२ सी ९४२३ बेळगावहून गोव्याला भाजीची वाहतूक करतेवेळी जांबोटी रोड किणये नजीक रस्त्यात केए २२ सी ६४६१ या ट्रकने पार्किंग केले होते. यामुळे भाजीची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला त्याचा अंदाज न मिळाल्याने हा अपघात घडला. या अपघातात भाजीच्या वाहनातील क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती ग्रामीण पोलीसाना मिळाली पोलीस घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागृहात हलवण्यात आला. या घटनेचा गुन्हा ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाला आहे.

दरम्यान शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.