बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. वेदांत आनंद मिसाळे याने कर्नाटक स्विमिंग असोसिएशन एन.आर.जे. स्टेट सब ज्युनियर आणि ज्युनियर चॅम्पियनशिप २०२५ मध्ये उत्तम कामगिरी सिद्ध केली. यांत त्याने २०० मीटर बटरफ्लाय मध्ये सुवर्णपदक आणि १०० मीटर बटरफ्लाय मध्ये सुवर्णपदक मिळविले तसेच ५० मीटर बटरफ्लाय मध्ये त्याने कांस्यपदक मिळविले. ही स्पर्धा बेंगळुरू येथील बसवनगुडी अॅक्वाटिक सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती, अहमदाबाद येथे होणाऱ्या वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला असून के. एस्. ए. बंगळुरूने घोषित केल्यानुसार वेदांतच्या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळाले आहे. याबद्दल शालेय एस. एम. सी कमिटीचे चेअरमन निवृत्त प्राचार्य आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर.एस. पाटील, सेक्रेटरी प्रोफेसर नितीन घोरपडे तसेच शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी वेदांतच्या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.