बेळगाव : वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा मंगळवारी २२ जुलै रोजी होत आहे.वडगाव शहर परिसरात सर्वात मोठी यात्रा म्हणून मंगाई देवी यात्रेची ख्याती आहे.
यात्रेनिमित्त देवीला पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर वडगाव आणि परिसरात वार पाळले जात आहेत. मंगळवार २२ जुलै रोजी यात्रेचा मुख्य दिवस असला तरी, देवीच्या दर्शनासाठी तीन ते चार दिवस मोठी गर्दी असते.यावर्षी शुक्रवार दिनांक २४ जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यात्रेनिमित्त २२ ते २४ जुलै दरम्यान मोठ्या संख्येने येणार्या भावीकांची दखल घेत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने आत्तापासूनच ज्या ठिकाणी समस्या आहेत.त्या सोडवाव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.