येळळूर, ता. ५ : येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलग १८ वर्षे वैद्याधिकारी म्हणून सेवा बजावल्याबद्दल तसेच त्यांची तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामस्थ, गावातील डॉक्टर संघटना, नेताजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, तसेच येळ्ळूर मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा नेताजी सोसायटीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला डॉक्टर संघटना येळ्ळूर आणि गावातील सामाजिक कार्यकर्याच्या उपस्थितीत त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. टी. मुंचडी होते. प्रारंभी प्रा. सी. एम. गोरल यांनी कार्यक्रम नियोजनाचा उद्देश स्पष्ट करून डॉ. रमेश दंडगी यांच्या कार्याचे कौतुक केले. अठरा वर्षे सेवा दिल्याबद्दल एक समाजशील डॉक्टर अशी त्यांची येळ्ळूर गावात मध्ये ओळख असून, त्यांना एक कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक डॉक्टर म्हणून गाव ओळखतो त्यांच्या काळात कॉलरा, डेंग्यु, कोविड, यासारख्या साथी आल्या असताना त्यांनी त्या अतिशय दक्ष पणे हाताळत रुग्णाना दिलांसा दिला. कोरोनाच्या काळात तर गावाला उत्तम आरोग्य सेवा देत येळ्ळूरसह, यरमाळ, हलगा धामणे, सुळगा गावातील रुग्णावर ही उपचार व मागदर्शन केले. एक डॉक्टरसह ते उतम प्रशासकही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत पीएचसीची सुसज्ज इमारत बांधून घेत येथे असणाऱ्या गैरसोयी दूर केल्या, असे विचार प्रा. सी. एम. गोरल, मुख्याध्यापक बबन कानशिडे, पत्रकार बी. एन. मजुकर व डॉ. तानाजी पावले यांनी मांडले.

सत्कार बद्दल डॉ. रमेश दंडगी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांच्या जागी नव्यने रुजु झालेल्या डॉ. स्मिता गोडसे यांचे ही स्वागत करण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, रमेश धामणेकर, यल्लुप्पा पाटील, सतीश पाटील, रघुनाथ मुरकुटे, सुरज गोरल, महादेव घाडी, दीपक हट्टीकर, भीमराव पुण्यान्नावर, डॉ. कुलदीप लाड, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. संतोष पाटील, डॉ. सतीश पाटील, डॉ. मनोज दीक्षित, डॉ. प्रसाद गोरल, डॉ.  रेहान्त यादव आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी सुरज गोरल यांनी आभार मानले.