- बेळगाव मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात मार्केट पोलीस स्थानकाच्या पथकास यश मिळाले आहे. पोलीस उपनिरीक्षक विचल हावन्नवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
बेळगाव शहर बस स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या मारुती भीमप्पा नायक (मूळ रा. भरमनट्टी, बेळगाव) याला पोलिसांनी चौकशीसाठी रोखले. तपासादरम्यान त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या बाळगण्यात आलेला धारदार लोखंडी चाकू आढळून आला. पोलिसांनी त्वरित चाकू जप्त करून त्याच्याविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे.
आरोपीविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, या कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक तथा पथकातील कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपआयुक्तांनी कौतुक केले आहे.








