सुळगा (उ.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळगा (उ.) गावात सोमवार (दि. १) डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणाऱ्या लक्ष्मी गल्ली येथील रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आले.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर खर्चाने रस्ते बांधले जात आहेत. रस्ता बांधकामामुळे गल्लीतील येण्या जाण्याची व्यवस्था अधिक सुलभ होणार असून ग्रामपंचायतीने हे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी काडा अध्यक्ष युवराज कदम, सुळगा (उ.) ग्रामपंचायत उपाध्यक्ष आणि सदस्य, देवस्की पंच व ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी, बाळू देसुरकर, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.