सुळगा (हिं.) / वार्ताहर

पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी, मोकळ्या स्मशानभूमी परिसरात वृक्ष वाढ व्हावी, या उद्देशाने पर्यावरणप्रेमी युवकांकडून सुळगा (हिं.) येथील स्मशानभूमीत रोपांची (वृक्ष) लागवड करण्यात आली. देवस्की पंच कमिटी अध्यक्ष बाळू मोनाप्पा पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते परशराम यल्लाप्पा पाटील यांनी ही रोपे उपलब्ध करून दिल्याबद्दल गावच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

या मोहिमेत विलास जांबोटकर, सुभाष अधिकारी, ग्रा. पं. सदस्य इराप्पा (पप्पू) भरमा पाटील, मंजुनाथ सुतार ,भरमा कोवाडकर, यल्लाप्पा कोवाडकर, मोहन पाटील, बाळू पाटील, परशराम पाटील यांच्यासह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.