बेळगाव : बेनकनहळळी, रामघाट रोड (ता. बेळगाव) येथील सुभाष गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे उद्या मंगळवारी (दि. २) सप्टेंबर रोजी गणहोम, सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाला दुपारी १२ वा. पासून सुरुवात होणार आहे.
तरी ज्या गणेश भक्तांना या शुभ कार्यासाठी देणगी किंवा वस्तू स्वरूपात सहकार्य करण्याची इच्छा असल्यास त्यांनी मंडळाला हे शुभकार्य यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य करावे तसेच महापूजा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाने कळविले आहे.