येळ्ळूर : सिद्धेश्वर गल्ली येथील श्रीमती कमळाबाई रामचंद्र गोरल (वय ८२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच कर्ते मुलगे, सुना, नातवंडे, नात सुना, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. येळळूर येथील प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर मनोहर रामचंद्र गोरल यांच्या त्या मातोश्री होत. तर सामाजिक कार्यकर्ते सुरज आनंद गोरल यांच्या त्या आजी होत. आज सायंकाळी चार वाजता येळ्ळूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
March 17, 2026
हिंडलगा येथे स्वच्छता मोहीम पर्यावरण जनजागृतीलाही चालना बेळगाव / प्रतिनिधी बेळगावातील मार्कंडेय नदीच्या संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना तसेच ‘मार्कंडेय वाचवा’ पथकाने पुढाकार घेत […]








