• अतिवाड ग्रामस्थांचा इशारा : बेकिनकेरे ग्रा. पं. अध्यक्ष व पीडीओंना निवेदन

उचगांव / वार्ताहर

नळाला शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी अतिवाड ग्रामस्थांनी बेकिनकेरे ग्रा. पं. अध्यक्ष व पीडीओंना निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, अतिवाड येथे मुबलक पाणीसाठा असूनही गेल्या आठ दिवसांपासून अतिवाड गावामध्ये नळाला नियमित पाणीपुरवठा होत नाही. परिणामी पाण्याविना अतिवाड येथील महिला व ग्रामस्थांना त्रास होतं असून ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. तरी मागणीनुसार या दोन दिवसात शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास सर्व ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अतिवाड ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.