बेळगाव / प्रतिनिधी
श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ (बेळगाव) यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ व्या वर्षातील ‘श्री हनुमान चित्ररथ स्पर्धा – २०२६’ तसेच ‘आकर्षक बैलजोडी स्पर्धा – २०२६’ आयोजित करण्यात आल्या आहेत.
चित्ररथ स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये ५००१, ३००१ आणि २००१ अशी रोख पारितोषिके तसेच आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धकांची निवड श्री हनुमानाची मूर्ती, बैलजोडीची मांडणी, रथाची सजावट, चाकांचे डिझाइन, जूची रचना, विद्युत रोषणाई, हिंदुत्व दर्शवणारी केसरी पताका आणि ध्वनी व्यवस्था अशा विविध निकषांवर गुणांकन करून केली जाणार आहे.
बैलजोडी स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांसाठी अनुक्रमे रुपये ५००१, ३००१, २००१, १५०१ आणि १००० अशी रोख बक्षिसे व चषक देण्यात येतील. यामध्ये बैलांची उंची, रंगसाम्य, शिंगे, कान, पाय, शेपटी, चालण्याची ढब, थाट, तसेच देशी जातीची वैशिष्ट्ये, सजावट आणि अलंकार या बाबींवर आधारित निवड केली जाईल.
या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ८४९७८५१९१३ किंवा ९६६५४५५२७९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.








